Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 डिसेंबर 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 डिसेंबर 2024 : ABP Majha
जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन (Ustad Zakir Hussain) यांची तब्येत खालावली असून गेल्या काही वर्षांपासून हृदयाशी संबंधित आजाराशी ते झुंज देत आहेत. अमेरिकेतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती त्यांची बहीण खुर्शीद यांनी एबीपी न्यूजशी बोलताना दिली आहे. त्यांचा मृत्यू झालेला नसून ते अजूनही हयात आहेत, अशी माहितीदेखील त्यांनी दिली आहे. दरम्यान, अमेरिकेतील रुग्णालयात झाकीर हुसैन यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. अशातच या सर्व अफवा असून ते अजुन हयात आहेत. अमेरिकेतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्यांच्या बहिणीनं एबीपी न्यूजशी बोलताना दिली आहे. एबीपी न्यूजनं लंडनमध्ये राहणाऱ्या झहीर हुसैन यांची मोठी बहीण खुर्शीद औलिया यांच्याशी संवाद साधला. खुर्शीद औलिया यांनी भाऊ झाकीर हुसैन यांच्या मृत्यूचं वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. खुर्शीद म्हणाल्या की, त्यांची मुलगी सध्या सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात आहे आणि काही काळापूर्वी त्यांच्या मुलीनं झाकीर हुसैन अजूनही हयात असल्याचं सांगितलं आहे. उस्ताद झाकीर हुसैन यांची बहीण खुर्शीद यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं की, "त्यांची प्रकृती चिंताजनक असली, तरी ते हयात आहेत. त्यांच्या मृत्यूची बातमी पसरवणारे कोणाच्या वतीनं त्यांच्या मृत्यूची पुष्टी करत आहेत? आणि ते असं का करत आहेत?" तसेच, कुटुंबीयांनी तरी अद्याप असं कोणतंही वक्तव्य जारी केलेलं नाही, असंही त्या म्हणाल्या. भावाच्या आजारपणामुळे त्यांना अमेरिकेला जावं लागलेलं, पण काही कारणास्तव त्या जाऊ शकल्या नाहीत आणि त्यामुळेच मुलीला तिथे पाठवावं लागल्याचं खुर्शीद यांनी सांगितलं. जास्त काम, धावपळ, थकवा, विश्रांतीचा अभाव आणि आहाराकडे लक्ष न देणं यांमुळे झाकीरच्या हृदय आणि यकृतावर विपरीत परिणाम झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं. तसेच, पुढे बोलताना त्यांनी झाकीर हुसैन यांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवू नका, अशी विनंतीही सर्वांना केली.