Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 8 सप्टेंबर 2024: ABP Majha

Continues below advertisement

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 8 सप्टेंबर 2024: ABP Majha

हेही वाचा 

 कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये आज पहाटे तीन वाजता अंतरवाली सराटी येथे भेट झाली, सरपंचाच्या घरी दोघांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि आरक्षणावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचं मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. दरम्यान आज परळी येथे मनोज जरांगे यांची घोंगडी बैठक होणार असून, त्या अगोदर दोघांमधील भेट महत्त्वाची मानली जाते. काल परळीमधील गणेश उत्सवाचा मध्यरात्री कार्यक्रम आटोपल्यानंतर धनंजय मुंडे थेट परळीतून अंतरवाली मध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. याबाबत धनंजय मुंडे यांचे अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

भल्या पहाटे धनंजय मुंडे जरांगेंच्या भेटीला 

धनंजय मुंडे यांनी भेटीचा इन्कार केला असला, तरी मनोज जरांगे पाटील यांनी भेटीचा तपशील सांगितला. जरांगे पाटील यांनी सांगितले की, मी झोपेत होतो. पहाटेच्या तीन वाजता ते आले असतील. आमच्यामध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. अंतरवलीत कोणीही येऊ शकतो. आमच्याकडे आयतं मैदान आहे. आम्हाला तयारी करायची गरज नाही, त्यांनी उद्या जरी निवडणूक घेतली तरी तयार असल्याचे ते म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram