Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 12 ऑगस्ट 2024: ABP Majha

Continues below advertisement

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 12 ऑगस्ट 2024: ABP Majha 

अजित पवारांच्या अल्टिमेटमला १० दिवस उलटले तरी मुंबई-नाशिक महामार्गाची परिस्थिती जेसे थेच, अजित पवार अधिकाऱ्यांना निलंबित करणार का याकडे लक्ष
माय माऊलींची राखी हाताला असेपर्यंत माझ्या जीवाला कुठलाही धोका नाही, धुळ्यात बोलताना अजित पवारांची भावनिक साद 
धुळे दौऱ्यादरम्यान अजित पवारांचा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद, लाडकी बहीण योजनेचा देखील पुरेपूर प्रचार 
वक्फ बोर्ड कायद्याबाबत चुकीचं घडत असेल तर मित्रपक्षांशी बोलणार, अजित पवारांचं वक्तव्य
लाडकी बहीण योजनेला काऊंटर म्हणून  काँग्रेसकडून कर्नाटकच्या धर्तीवर महालक्ष्मी योजनेचं आश्वासन, तर काँग्रेसच्या योजना फसव्या असल्याचा बावनकुळेंचा पलटवार
५ दिवसात भाजप आणि महायुती प्रचाराचे रान उठवणार, १६ ते १८ ऑगस्टदरम्यान अमित शाह महाराष्ट्रात तर १६ ऑगस्टला जेपी नड्डाही साताऱ्यात
ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शरद पवारांची भूमिका, तर केरे पाटलांसोबत ओबीसीवर चर्चा झाल्याचा पवारांकडून इन्कार
मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा, शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला, जरांगे आणि ओबीसी नेत्यांनाही बैठकीसाठी बोलवण्याचीही सूचना
मातोश्रीबाहेर घोषणाबाजी करणारी माणसं एकनाथ शिंदेंसोबतची, फोटो दाखवून संजय राऊतांचा आरोप, सगळं दिल्लीच्या इशाऱ्यावर सुरु असल्याचाही दावा..
विधानसभा निवडणूक लढवण्यावर मनोज जरांगे २९ ऑगस्टला निर्णय घेणार, छगन भुजबळ आणि अनिल भोंडेना महत्त्व देत नाही... जरांगेंचं विधान
महाराष्ट्रात भाजपाने १५० पेक्षा जास्त जागा
लढवाव्यात, कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचं मत
पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाचा मोठा दिलासा, २१ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश, दिल्ली पोलीस आणि यूपीएससीला नोटीस जारी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram