Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM :2 डिसेंबर 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM :2 डिसेंबर 2024 : ABP Majha
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकालानंतर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघारी फिरत एकनाथ शिंदेंनी भाजपला रस्ता मोकळा करून दिला. दुसरीकडे निवडणुकीतील पराभवानंतर विरोधक evm वर संशय घेत आक्रमक होताना दिसत आहेत. दरम्यान तब्येतीचा कारणामुळे दरेगावात एकनाथ शिंदे गेल्याने विरोधकांकडून शिंदेंवर टोलेबाजी होत आहे. या टोलेबाजीत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही उतरली आहे. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी ईव्हीएमवर संशय घेत दरेगावात जाण्यावरून एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय. मुख्यमंत्र्यांना ताप काय आला.. ते दरे गावात जाऊन काय बसले... शेवटी यांना बीजेपी सांगेल तेच करायचे आहे. ईव्हीएम वरून लक्ष हटवण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचा संशय राजू पाटील यांनी व्यक्त केला. कल्याण ग्रामीण मतदारसंघात वाढलेली 65 हजार मते यांनाच कसे पडली असा सवाल करत हे सगळं संशयास्पद असल्याचं मनसे माजी आमदार राजू पाटील म्हणालेत. मनसेचा EVM वरून एकनाथ शिंदे ंना टोला मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी देखील ईव्हीएम बाबत संशय व्यक्त केलाय .कल्याण ग्रामीण मतदारसंघात एकूण 65 हजार मतदान वाढले आणि 66 हजार मतांनी शिंदे गटाचे राजेश मोरे विजयी झालेत . वाढलेलं सगळंच मतदान त्यांनाच मिळालं का ? असा सवाल मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केला आहे .एकूणच ही सर्व परिस्थिती संशयास्पद असल्याचा आरोप करत व्हीव्हीपॅट मशीनमधील मते मोजण्याकरीता आठ लाख रुपये भरले आहेत असा आरोप मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केला.