Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM :26 डिसेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

 Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :26 डिसेंबर 2024 : ABP Majha

कल्याण (Kalyan Crime) येथील अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या करण्यापूर्वी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर वातवरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळीला (Vishal Gawali) पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण पोलिसांची सहा पथके त्याच्या मागावर होती. शेगाव येथून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.   अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण कल्याणला हादरवून सोडलं आहे. लोकांच्या मनात या घटनेवरुन प्रचंड रोष आहे. परवा संध्याकाळी कल्याण कोळसाडी परिसरातून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह काल दुपारी कल्याण भिवंडी मार्गावरील बापगाव परिसरात एका कब्रस्तानमध्ये सापडला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी हा त्याच्या पत्नीच्या गावी लपून बसला होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून तो कल्याणहून कसा पळाला, याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.  आरोपी विशाल गवळी कल्याणमधून कसा पळाला?  अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीने मृतदेह कल्याणच्या बापगावमध्ये फेकला. या घटनेनंतर त्याच्या पत्नीने आरोपी विशाल गवळीला कल्याणमध्ये न थांबण्याचा सल्ला दिला आणि तिच्या माहेरी जायला सांगितलं. विशाल गवळी कल्याणमधून बाहेर पडण्यापूर्वी एका बारमध्ये त्याने मद्यप्राशन केलं. कल्याणमधून ठाण्यात आणि ठाण्यातून आरोपीने दादर गाठलं. दादरहून त्याने एक्स्प्रेस ट्रेन पकडून शेगाव गाठले, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram