Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 17 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 17 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच राज्यपाल नियुक्त आमदारांना संधी देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्याच्या महायुती सरकारने सूचवलेल्या नावांपैकी 7 नावांची निवड राज्यपालांच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी करण्यात आली. त्यामध्ये, शिवसेना शिंदे गटाचे दोन, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन आणि भाजपच्या तीन नेत्यांना संधी देण्यात आलीय. मात्र, या आमदारकीच्या निवडीनंतर राजकीय पक्षातील काही नेत्यांनी नाराजी उघड करत पक्षातील पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामध्ये, पुण्यातील (Pune) अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर (Deepak mankar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसेच, या राजीनाम्यानंतर त्यांनी थेट अजित पवारांना लक्ष्य करताना रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांनाही टोला लगवला होता. आता, दीपक मानकर यांच्या वक्तव्यावर रुपाली चाकणकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या कोट्यात तीन जागा असत्या तर मी आमदार झाले असते, असेही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं. 

राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारांच्या नियुक्त्या गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होत्या. त्या नियुक्त्यांकडे सर्वच राजकीय पक्षांचं आणि नेत्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर काल मंगळवारी विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधी महायुतीतील पक्षांनी राज्यपालांकडे सात नावे पाठवली. त्या सात सदस्यांच्या नावांना राज्यपालांनी सहमती दर्शविल्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या सर्व सात सदस्यांना आमदारकी पदाची शपथ दिली. त्यामुळे आता इच्छुक नेत्यांमध्ये नाराजीचे सूर दिसून येत आहेत. पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते दीपक मानकर यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली. तसेच, आम्हाला का संधी मिळाली नाही, रुपाली चाकणकरांनाच सातत्याने संधी का मिळते, त्या कार्यकर्तीला तुम्ही ताकद देता, 24 तास तुमच्यासोबत असतात म्हणून त्यांचीच बाजू तुम्ही घेणार का, आम्हाला का नाही विचारणार, असे दीपक मानकर यांनी म्हटले होते. आता, दीपक मानकर यांच्या राजीनाम्यावर रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''मानकर यांना शहराध्यक्षपद देताना मी भगिनी म्हणून मानकर यांच्या पाठीशी उभी होते. पण, त्याने अस का केलं मला माहिती नाही,'' असं प्रत्युत्तर रुपाली चाकणकर यांनी दिलंय. रुपाली चाकणकर यांनी मानकर यांच्यावर अधिक बोलणे टाळले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram