TOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP Majha
महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्यातला प्रचार अखेर संपलाय...अखेरच्या दिवशी महायुती आणि मविआच्या नेत्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी सभांचा धडाका लावला.. हा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा असून
उद्या १३ जागांवर मतदान होणार आहे...तर मुंबईतल्या तीन मतदारसंघात मशाल विरुद्ध धनुष्यबाण म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव, दक्षिण मध्यमधून अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे लढत, वायव्य मुंबईत अमोल कीर्तिकर रवींद्र वायकरांना भिडणार आहेत.. तर नाशिक, ठाणे कल्याणमध्येही शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार आहेत..
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्याची.. शुरु मे हम अक्षम होंगे थोडा कम होंगे, आरएसएस की जरुरत पडती थी, आज हम बढ गये हैं, सक्षम हैं, तो बीजेपी अपने आप चलती है.. हे वक्तव्य आहे जे पी नड्डा यांचं.. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलंय. वाजपेयींच्या काळातील भाजप आणि सध्याच्या भाजप यातील फरक काय असा प्रश्न नड्डांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे तर भाजप हा राजकीय पक्ष आहे हे अधोरेखित करायला देखील जे पी नड्डा विसरले नाहीत.