Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha 02 August 2024
अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये आरक्षण, सुप्रीम कोर्टाची मंजुरी, क्रिमी लेयरची मर्यादा ओलांडणाऱ्यांना ओळखून त्यांचा आरक्षणाचा अधिकार काढून घ्यावा, कोर्टाचा निर्णय.
लातूरच्या उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्याकडून अनुसूचित जाती, जमाती बाबतच्या कोर्टाच्या निर्यणाचं स्वागत, समाजातील छोट्या-छोट्या वंचित घटकांना निर्णयाचा लाभ होईल अशी प्रतिक्रिया.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींबाबतच्या महत्वपूर्ण निकालामुळे समाजाला फायदा होईल, भाजपचे आमदार अमित गोरखे यांच्याकडून विश्वास व्यक्त.
एससी एसटी वर्गीकरण करण्याचा दिलेला निर्णय वादग्रस्त, सर्वोच्च न्यायालयाने निकालाचा पुनर्विचार करावा, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया.
एससी, एसटी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायलयानं दिलेल्या निकालाला आव्हान देणार, हा निकाल आरक्षणाचा मूळ हेतू बदलणारा आणि आगामी निवडणुकांवर प्रभाव टाकणारा असल्याचा अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा आरोप.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं सुषमा अंधारेंकडून स्वागत, अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये वर्गवारी करण्यास मान्यता देणारा कोर्टाचा निर्णय स्वागतार्ह, अंधारेंची प्रतिक्रिय़ा.
एससी, एसटी आरक्षणाच्या उप वर्गीकरणाच्या निर्णयाबद्दल काँग्रेस नेते नितीन राऊतांकडून साशंकता व्यक्त, सध्या अशा निर्णयाची काय गरज, राऊतांचा सवाल.
मराठा समाजाचं मागासलेपण अपवादात्मक, त्यांच्याकेड तुच्छतेने पाहिलं जातं, त्यामुळे नोकरी आणि शिक्षणात मराठ्यांना आरक्षण देणं गरजेचं, राज्य मागासवर्ग आयोगाचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र.
महाराष्ट्रातील सर्व समाज ओबीसी आरक्षणात जात नाही तोपर्यंत ईडब्लूएस रद्द करू नका, मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी.
मनोज जरांगे आज पुणे न्यायालयात उपस्थित राहणार, २०१३ ला नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगेंवर गुन्हा दाखल.