
Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 02 Feb 2025 : ABP Majha
Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 02 Feb 2025 : ABP Majha
संजय शिरसाट महान आहेत
ते काहीही करु शकतात, संजय राऊतांचा टोला, शिरसाट शरद पवार अजित पवारांनाही एकत्र आणू शकतात, राऊतांची खोचक टीका
संजय शिरसाट यांनी मध्यस्थी करण्याआधी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांची मते जाणून घ्यावी, नितेश राणेंची प्रतिक्रिया, शिरसाट आमचे मित्र त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये इतकीच अपेक्षा, राणेंचा टोला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांचा फोन टॅप होत असल्याचा संशय, शिंदे गटाचा एक आमदार विमान प्रवासात भेटला त्याने ही माहिती दिली, संजय राऊतांचा रोखठोकमधून गौप्यस्फोट.
मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने शिंदे समाधी अवस्थेत, शिंदे सेनेच्या आमदारानं सांगितल्याचा संजय राऊतांचा दावा, निवडणुकीनंतर शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचं अमित शाहांनी आश्वासन दिलेले, मात्र शाहांनी ते पाळलं नाही, फसवणूक झाल्याचं शिंदेंना वाटतं,असाही दावा
महाराष्ट्रातील सरकार बहुमतातील असलं तरी त्यांच्यात एकवाक्यता नाही,
संजय राऊतांची टीका,
शिंदेंची कुरघोड्या करण्याची ताकद भाजपने संपवली,
निवडणुकांनंतर त्यांना खड्यासारखं बाजूला केलं, राऊतांचा टोला