Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 31 July 2024

Continues below advertisement

मराठा आरक्षण संदर्भात गठित केलेल्या शिंदे समितीला ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ. कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात समितीनं इतर राज्यात जाऊन केला होता अभ्यास.

मनोज जरांगेंना आपण मानतोे, मराठा समाजासाठी त्यांनी काम केलं, न्यायालयात टिकेल असं आरक्षण देण्याबाबत सरकार कटीबद्ध, लातूरमधल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत अशोक चव्हाण यांचं वक्तव्य 

आज मराठा ठोक मोर्चाचे नेते रमेश केरे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर धडकणार, ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत विचारणा करणार.  

जरांगेंच्या मागणीला समर्थन आहे की नाही हे भाजप नेत्यांनी स्पष्ट करावं, प्रकाश आंबेडकरांची मागणी, तर ओबीसी आणि मराठा आरक्षण वेगळं असावं या भूमिकेवर वंचित ठाम, आंबेडकरांचं वक्तव्य.  

मराठ्यांना दिलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासह इतर मागण्यांसाठी नांदेडमध्ये ओबीसी आंदोलक आक्रमक, मोर्चा काढत दिली हिमायतनगर बंदची हाक.  

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी उरण प्रकरणातील कुटुंबीयांची घेतली भेट. दोषीवर कठोर कारवाईचं दिलं आश्वासन. 

राज्य महिला आयोगाकडून यशश्री शिंदे हत्याकांडाची दखल, उरण पोलिसांकडून मागवला अहवाल, तपास प्रगती अहवाल सादर करण्याचेही निर्देश.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram