Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 10 Sep 2024 : ABP Majha Latest News

Continues below advertisement

Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 10 Sep 2024 : ABP Majha

पंतप्रधान नरेंद्र मोदी २० सप्टेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर, कौशल्य विकास विभागाच्या केंद्राचं पंतप्रधान उद्घाटन करणार, राज्यातील एक हजार महाविद्यालयात शासनातर्फे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन केली जाणार.

अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीत राज्यातील किमान २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढतींचा भाजप नेत्यांचा आग्रह, जागावाटपाच्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांनी अमित शाहांना तसा प्रस्ताव दिल्याची माहिती.

महायुतीमध्ये कुठेही मैत्रीपूर्ण लढत नाही, प्रफुल पटेल यांची एबीपी माझाला माहिती , सध्या जागा वाटपामध्ये ज्या पक्षाचा आमदार त्यालाच पुन्हा संधी मिळावी हीच भावना, प्रफुल पटेल यांचं वक्तव्य.

नागपूर अपघात प्रकरणात संकेत बावनकुळेंची काल रात्री उशिरा पोलिसांकडून चौकशी, पोलिसांनी घटनेसंदर्भात घेतली माहिती. 

महायुतीतल्या नेत्यांच्या मुलांसाठी सामांन्यांचा जीव स्वस्त झालाय का? नागपूर अपघात प्रकरणावरुन काँग्रेसच्या अतुल लोंढेंचा सवाल, गाडी बावनकुळेंची असल्याची माहिती असतानाही कारवाई का नाही, अतुल लोंढे संतप्त.

नागपुरात ज्या ऑडी कारनं दुचाकीला धडक दिली ती बावनकुळेंची असून, त्यांचा मुलगा संकेत बावनकुळे गाडीत उपस्थित होता, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा आरोप, कारवाई का केली नाही, अंधारेंकडून सवाल उपस्थित. 

 नागपूर अपघातप्रकरणी पोलिसांच्या पुढील तपासात संकेत बावनकुळे दोषी आढळला, तर त्यावर कारवाई झाली पाहिजे ही काँग्रेसची भूमिका, आमदार विकास ठाकरेंची प्रतिक्रिया. 

नागपूर हिट अँड रन प्रकरणावरून विरोधकांचा निशाणा, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या मुलाचं नाव एफआयआरमध्ये का नाही?, संजय राऊतांचा सवाल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram