Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 29 July 2024

Continues below advertisement

भंडारा शहरात ७७ मिलिमीटर पावसाची नोंद, अनेक घरात शिरलं पावसाची पाणी, आठवडाभरात पुन्हा एकदा पूरपरिस्थिती. 

भंडाऱ्याच्या खात रोडवरील पूरबाधितांचं भर पावसात आंदोलन, प्रत्येक वेळी येणाऱ्या मुसळधार पावसानंतर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरत असल्यानं नागरिक संतप्त.

भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस,  तीस पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला, रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे  वाहतुकीसाठी मार्ग बंद. 

भंडाऱ्यात मुसळधार पाऊस, गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमामात वाढ,  गोसीखुर्द धरणातून 3 लाख 2 हजार 702 क्यूसेक पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन.

कोल्हापूरमधल्या पूरस्थितीची खासदार शाहू महाराजांकडून पाहणी, यावेळी आमदार सतेज पाटलांचीही उपस्थिती, आजरा, चंदगड, कोवाड इथल्या नगरिकांशी साधला संवाद. 

कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात दमदार पाऊस, ताम्रपर्णी आणि घटप्रभा नदीचे पाणी पात्राबाहेर, भाजप नेते शिवाजीराव पाटलांकडून पूरस्थितीची पाहणी.  

कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती, उस पिकांत शिरलं पुराचं पाणी, तर कोवाड बाजारपेठेत पाणी शिरल्याने दुकानांचं नुकसान.

वर्ध्यात वाघाडी नदीच्या पुरात अडकलेल्या तिघांची पोलिसांकडून सुटका, समुद्रपूर तालुक्यातील घटना.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram