Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 28 July 2024

Continues below advertisement

कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी, कुरुंदवाडच्या अनेक भागातील घरं पाण्याखाली,  कुरुंदवाड बसवाड कवठेसार भागातील ५० हून अधिक कुटुंबांचं स्थलांतर. 

कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचा आणखी एक दरवाजा बंद, दोन स्वयंचलित दरवाजातून विसर्ग सुरू, कोल्हापूरकरांना मोठा दिलासा. 

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत संथ गतीने वाढ, कृष्णा नदीची पातळी ४० फुटांवर, पुराचा धोका नसला तरी नागरिकांना सतर्कतेचा इशारा कायम.  

नागपूरचा अंबाझरी तलाव ओवरफ्लो होऊ नये म्हणून प्रशासन सतर्क, तलावात साठवलेल्या पाण्याची पातळी ३१६ मीटरवर . 

नांदेडच्या धानोरा मक्ता इथं मागणी करुनही रस्त्याचं काम अपूर्णच, रस्त्यावर साचलेल्या गुडग्या इतक्या पाण्यातून गावकऱ्यांना न्यावी लागील अंत्ययात्रा. 

अहमदनगरच्या कोपरगावात नदीपात्रातील वाहनं काढण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना महिलेनं वाचवलं, एकाचा मृत्यू, तीन जण नदीपात्रात वाहनं काढण्यासाठी गेल्याची माहिती.  

यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात बैलगाडी गेली वाहून,  आर्णी तालुक्यातील उमरी कापेश्वर ते झापरवाडी दरम्यानची घटना, शेतकरी थोडक्यात बचावला, जनावरांचा शोध सुरु. 

वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा पूल आणि रस्ता खचला, दोन वर्षापासून नागरिक पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, लवकर पूल दुरूस्तीची मागणी. 

वाशिमच्या मंगरूळपीरमध्ये नगरपालिकेअंतर्गत भर पावसामध्ये सिमेंट रस्ता बनवण्याचं काम सरू, पावसानंतर काम सुरू करण्याची नागरिकांची मागणी.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram