Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 27 July 2024

चंद्रपूर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, खबरदारी म्हणून सर्व अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस बंद राहणार. 

सांगलीच्या मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी, कृष्णा- वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.  

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कणेगाव, भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा विळखा, गावाचा संपर्क तुटल्यामुळे नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर.  

हिंगोलीच्या येलकीमध्ये मोठया प्रमाणात पाऊस,  नदी- नाल्यांना पूर, 4 गावांचा तुटला संपर्क, वाहतूकही खोळंबली, काही नागरिकांनी जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यातून काढला मार्ग. 

पंढरपूरच्या वीर धरणातून पाण्याचा विसर्ग, यामुळे अकलूजची नीरा नदी दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र,   

छत्रपती शाहू महाराजांकडून कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाहणी, आंबेवाडी आणि चिखली या दोन्ही गावातील परिस्थितीचाही घेतला आढावा. 

नंदुरबार-सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरु, रेल्वे मार्गावर पाणी आणि मातीचा ढिगारा आल्याने रेल्वे वाहतूक होती ठप्प. 

छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली,  4 हजार 925 क्यूसेकने पाण्याची आवक सुरू,  धरणात साडेचार टक्के पाणीसाठा .  

रायगडच्या नागोठणे इथं झालेल्या पावसात अनेक व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान, नुकसान भरपाई देण्याची व्यापारी वर्गाची मागणी.  

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola