TOP 100 Headlines : 2 July 2024: 6 AM : ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ जुलैला मुंबई दौऱ्यावर, लोकसभा निकालानंतर मोदींचा पहिलाच मुंबई दौरा, महायुती विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार
राज्याची जनता हाच माझा पक्ष, अजित पवारांचा दावा, तर अजित पवारांनी काकांचा पक्ष चोरला, संजय राऊतांचा टोला
अंबादास दानवेंच्या निलंबनाचा आज फेरविचार, देवेंद्र फडणवीसांची माहिती.. तर इन्स्टाग्राम प्रोफाईल बायोमध्ये दानवेंकडून निलंबित विरोधी पक्षनेता असा उल्लेख
विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस, १२ उमेदवार रिंगणात असल्याने प्रचंड चुरस
मनसेमध्ये वंचितमध्ये गेलेले वसंत मोरे आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार, ठाकरे गटात प्रवेश करण्यास मोरे इच्छुक
भाजप आमदार गणेश नाईकांचा सरकारला घरचा आहेर, सरकार आणि सिडकोमध्ये बिल्डरांचे दलाल बसल्याचा आरोप, अजित पवारांच्या खास सूचनेनंतर झाली नाईकांच्या लक्षवेधीवर चर्चा