Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP Majha

Continues below advertisement

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP Majha 
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सहा आरोपींना आज बीड न्यायालयात हजर केलं जाणार, सुदर्शन घुले, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणेला हजर करण्यात येणार. 
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांचे भाऊ धनंजय देशमुख आज न्यायालयात जबाब नोंदवणार, तसेच सर्व आरोपींना कुणी आश्रय दिलेला त्या सर्वांनाही अटक करण्याची मागणी 
वाल्मिक कराडची दोन्ही पत्नींच्या नावे पुण्यात कोट्यवधींची संपत्ती, पुण्यात आणखी तीन फ्लॅट्स असल्याची एबीपी माझाला माहिती, दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या दोन मुलांच्या नावे  देखील संपत्ती 
वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे सोलापुरात ४ सातबारे, अंजली दमानियांकडून पुरावे शेअर करत एक्सपोस्ट, 
वाल्मिक कराडशी संबंधित चौकशी कुणाच्या दबावाखाली न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश, प्रत्येक माहितीची सीआयडी दखल घेऊन तपास करत असल्याची अजितदादांची माहिती 
बीड प्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही? कोणी अडवलंय? आदित्य ठाकरेंचा सवाल 
नांदेडच्या पालकमंत्रिपदी धनंजय मुंडे नको, सकल मराठा समाजाची मागणी, मुंडेंकडे नांदेडचं पालकमंत्रिपद दिल्यास रस्त्यावर उतरण्याचाही दिला इशारा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram