Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | 15 DEC 2025 : ABP Majha
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, तेजस्वी घोसाळकर भाजपात पक्षप्रवेश...महापालिका निवडणुकीत भाजपची ताकदज वाढणार...
नागपूर,चंद्रपूसह सर्व २९ महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात होण्याची शक्यता, पुढल्या आठवड्यात घोषणा..१५ जानेवारीदरम्यान मतमोजणी होण्याची शक्यता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर..फडणवीस पुणे, कोल्हापूर आणि सांगलीला भेट देणार..विविध विकास कामांचं उद्घाटन करणार..
भाजप आमदार कृष्णा खोपडेंच्या आरोपांवर पहिल्यांदाच तुकाराम मुंढेंची 'माझा'ला प्रतिक्रिया...काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही म्हणून विरोधात कट रचून त्रास दिल्याचा दावा...
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी...शारीरिक शिक्षेवर बंदी, गंभीर प्रकरणांमध्ये पोलीस कारवाई अनिवार्य...१०० उठाबशा काढायला लावणाऱ्या वसईतल्या शाळेची नोंदणीही रद्द...
पुण्याच्या राजगुरुनगरातील खासगी क्लासमध्ये शिक्षक शिकवत असतानाच एका विद्यार्थ्याकडून गळा चिरून हत्या...हल्ला करणारा विद्यार्थी फरार, हल्ल्याचे कारण मात्र अस्पष्ट
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळावरील विमानसेवा विस्कळीत...एकूण 250 विमानं उशिरानं, प्रवाशांना प्रचंड मनस्ताप...
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरुच, रुपया ९०.५६ च्या नीचांकी पातळीवर.