TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 27 June 2024 : 07 AM : ABP Majha
TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 27 June 2024 : 07 AM : ABP Majha
आजपासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन, मुंबईतील विधान भवनात एकूण १३ दिवस चालणार कामकाज,अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल होणार सादर.
महायुती सरकारचं हे विधानसभा निवडणुकीपूर्वीचं शेवटचं अधिवेशन असणार,त्यामुळे विरोधक सुद्धा या अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत.
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर सत्ताधाऱ्यांकडून चहापानाचा कार्यक्रम, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित.
राज्य सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून आमंत्रित केलेल्या चहापानावर बहिष्कार.
विरोधकांनी प्रथेप्रमाणं चहापानावर बहिष्कार टाकला, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला, पाठ्यपुस्तकात खोटं बोल पण रेटून बोल हा विरोधकांचा पवित्रा, फडणवीसांची टीका.
मुंबईच्या ताज लँड येथे झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंकडून सर्व आमदारांना मार्गदर्शन,अधिवेशनात पूर्णवेळ उपस्थित राहण्याच्या दिल्या सूचना, तर दररोज शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर प्रश्न विचारा,बैठकीत चर्चा