सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 13 January 2025 Top 100 06AM Superfast
सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 13 January 2025 Top 100 06AM Superfast
वाल्मिक कराडवर मकोका लावण्याच्या मागणीसाठी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आज टॉवरवर चढून आंदोलन करणार, हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर कारवाई का केली नाही, धनंजय देशमुखांचा सवाल.
सरपंच हत्येप्रकरणी मस्साजोगच्या ग्रामस्थांचा निर्वाणीचा इशारा, कराडवर मकोका न लावल्यास सामूहिक आत्मदहन करणार, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा संक्रातीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा.
विष्णू चाटेचा मोबाईल अजूनही सापडलेला नाही, जरी फोन सापडला नाही तरी तो 6 ते 10 तारखेच्या दरम्यान कोणाशी बोलला ते समजलं पाहिजे, सुरेश धस यांचं सरपंचांच्या हत्येबाबत वक्तव्य.
बीडमध्ये दाऊदपेक्षा मोठे गुंड, राजकारणी गुंडांना पोसतायत की गुंड राजकारण्यांना? विजय वडेट्टीवारांचा सवाल, तर ((भाजप आमदार)) सुरेश धस उघडपणे बोलतायत, त्यावर सरकारनं लक्ष द्यावं, वडेट्टीवारांचा सल्ला.
बीडच्या सौंदानामधील सरपंच अपघात प्रकरणात गुन्हा दाखल, परळी पोलिसांनी टिप्पर घेतला ताब्यात, चालकाचा शोध सुरू.