Top 100 Headlines : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 28 July 2024

Continues below advertisement

गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यानं धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडले, धरणातून सध्या 1 लाख 55 हजार 559 क्युसेकने पाण्याचा विसर्ग, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. 

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणीपातळी एक इंचाने कमी, सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ४७.७ फूटांवर .

अलमट्टी धरणामधून सव्वातीन लाख पाण्याचा विसर्ग , यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत एक इंचाने घट. 

कोल्हापुरात पुराच्या पाण्यातून भर पावसात रुग्णाला बोटीतून आणत सामाजिक कार्यकर्त्याने त्याचा जीव वाचवला, हृदयविकाराचा त्रास जाणवत असलेल्या रुग्णाला संभाजी घोरपडेंनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. 

नांदेडमध्ये एका तरुणाला पुराच्या पाण्यात मोटरसायक नेणं पडलं महागात, तरुण थोडक्य़ात बचावला, मोटरसायकल मात्र गेली वाहून, व्हिडीओ व्हायरल. 

वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नदीला आलेल्या पुरात तीन जण अडकले, अडकलेल्या तिघांनीही झाडाचा आधार घेतला. 

गडचिरोली जिल्ह्यात रिमझिम पाऊस, पार्लकोटा नदीच्या पातळीत वाढ, पुराचं पाणी भामरागडच्या बाजारपेठेत शिरलं, ५० पेक्षा अधिक दुकानं, घरे पाण्याखाली

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram