Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 08 ऑक्टोबर 2024 : ABP Majha : 6 AM

Continues below advertisement

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 08 ऑक्टोबर 2024 : ABP Majha : 6 AM
हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल. सकाळी ८ वाजता मतमोजणीला होणार सुरवात.हरियाणाच्या ९० आणि जम्मू – काश्मीरमधील ९० जागांसाठी झालं होतं मतदान
सुधाकर शिंदे समितीचा अहवाल मंत्रालयात सादर, शिंदेंच्या ९ जणांच्या समितीने ९ महिने ५ राज्यात जाऊन धनगर आरक्षणसंदर्भात अभ्यास करून हा अहवाल तयार केल्याची माहिती.
डॉ. सुधाकर शिंदे समितीचा अहवाल वादळी ठरण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. इतर राज्यांमध्ये धनगर समाजाला आदिवासींची प्रमाणपत्र दिल्याच अहवालात नमूद. हा अहवाल आज मंत्रिमंडळाच्या बैठकी समोर येणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आज सोलापूर दौऱ्यावर. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार. 
आज महाविकास आघाडीची बैठक होणार, बैठकीला सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार, जागावाटपावर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram