Top 100 Headlines : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 28 July 2024

Continues below advertisement

राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता, गुरुवारपर्यंत राज्यात कुठेही रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी नसून, काही ठिकाणी तुरळक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. 

पुण्यातील खडकवासला धरणातून 22 हजार क्यूसेकने विसर्ग, तर भिडे पूल पाण्याखाली गेल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

मुंबईतील १० टक्के पाणी कपात आजपासून मागे, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय.,

मुंबईच्या धरणांमध्ये ७३ टक्के साठा, मुंबईकरांना पुढील २६४ दिवस पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये उपलब्ध.

मुसळधार पावसामुळे नागपूरच्या  तोतलाडोह प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडले, तर निम्न वेणा धरणाचे 21 दरवाजे आणि नांद धरणाचे 7 दरवाचे उघडले असून धरणातून 1 हजार 867 क्युसेकने पाण्याचा विसर्ग.

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलाव ओव्हरफलो, पर्यटकांची गर्दी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त.

कोल्हापूरकरांना काहिसा दिलासा, पंचगंगेच्या पाणी पातळीत एक फुटांची घट, पाणीपातळी 46.6 फुटांवर.

सांगलीचा पुराचा धोका तूर्त तरी टळला, कृष्णा नदीची पाणी पातळी आणखी ओसरली, मात्र  चांदोली धरण परिसरामध्ये पावसाची मुसळधार बॅटिंग कायम. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram