Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 23 July 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी, गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यांत पावसाचं थैमान, अनेक नद्यांना पूर
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज.
गडचिरोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे जिल्हाधिकारींचे आदेश
कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पातळीत संथगतीने वाढ, खबरदारी म्हणून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना स्थलांतरित करण्याचं आवाहन.
कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा शिवाजी विद्यापीठाला फटका, अनेक भागातील रस्ते बंद झाल्याने परीक्षा स्थगित, स्थगित केलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करणार.
पालघर जिल्ह्यातील वाडा,विक्रमगड,तलासरी तालुक्यात मुसळधार पाऊस, पिंजाळ नदीला पूर, शिलोत्तर पूल पाण्याखाली, तलासरीमध्ये सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम.
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, सांगली महापालिका अलर्ट मोडवर,सांगलीत रात्रीपर्यत 30 फुटांवर पाणी पातळी जाण्याची शक्यता, सूर्यवंशी प्लॉटमधील नागरिकांना स्थलांतर होण्याच्या सूचना.