TOP 100 Headlines : सकाळी 6AM च्या 100 हेडलाईन्स : 6AM 19 June 2025 : Superfast News
शिवसेनेचा ५९वा वर्धापन दिन, मुंबईत ठाकरे आणि शिंदेंकडून मेळाव्याचं आयोजन..महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेना प्रचाराचा नारळ फोडणार ((ठाकरेंच्या शिवसेनेकडून निष्ठावंताचा उल्लेख तर शिंदेंच्या शिवसेनेचं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोट))
मनसेशी युतीबाबत मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंची माजी नगरसेवकांना विचारणा.. तर युतीचा फायदाच होणार असल्याचा माजी नगरसेवकांचा सूर... सर्वांना विश्वासात घेऊन युतीबाबत निर्णय होणार.
नव्या जीआरमध्ये पहिलीपासून हिंदीसाठी 'अनिवार्य' शब्द मागे...पण त्रिभाषा सूत्र कायम...हिंदीसक्ती केल्यास संघर्ष अटळ, राज ठाकरेंचा सरकारला इशारा...
एनईपीमध्ये तीन भाषांचं सूत्र, महाराष्ट्रात दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण...तर पत्र पाठवत राज ठाकरेंकडून फडणवीसांचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न...
शिवसेनेच्या भरत गोगावलेंचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल... घरात मांत्रिकाकडून पूजा करत असल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांकडून शेअर...
वाहनचालकांसाठी मोठी बातमी, फास्टॅग आधारित ३ हजार रुपयांच्या पासचा पर्याय १५ ऑगस्टपासून उपलब्ध होणार, वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास वाचणार
कोणत्याही परिस्थितीत शरण येणार नाही, इराणनं अमेरिकेला ठणकावलं... अमेरिकन सैन्यानं युद्धात हस्तक्षेप केला तर परिणाम वाईट होतील, इराणचा इशारा...
अरण्यऋषी मारूती चित्तमपल्ली यांचं सोलापुरात निधन...वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...बऱ्याच दिवसांपासून होते आजारी...
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार...माऊली पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली