Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 03 PM : 16 September 2024: ABP Majha

Continues below advertisement

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांची जीभ सुटली, राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचं बक्षीस देऊ अशी मुक्ताफळं...

बेताल संजय गायकवाडांवर काँग्रेस तुटून पडली, यशोमती ठाकूर म्हणाल्या, गुंड आणि फालतू माणूस, बळवंत वानखेडेंनी ठरवले अडाणी...

शरद पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादी कॅन्सर, गोपीचंद पडळकरांची पातळी सोडून टीका

सरकारला अखेरची संधी, आम्हाला आता दोष देऊ नका, जरांगेंचा सरकारला इशारा, आज मध्यरात्रीपासून उपोषण

धनगर, धनगड एकच असल्याचा जीआर काढणार, पण राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळांचा विरोध, सर्व आदिवासी नेत्यांच्या बैठकीनंतर पुढील भूमिका करणार स्पष्ट

सुजय विखे पाटील बाळासाहेब थोरातांना आव्हान देण्यास इच्छुक, संगमनेरमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक

जळगावचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, जामनेरमध्ये गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे लढत शक्य

घाटकोपर असल्फा इथे शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, दोन माजी नगरसेवकांची एकमेकांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की, पाण्यासाठी मोर्चा सुरू असताना राडा

स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घ्या, विद्यार्थी असंतोषावर मार्ग काढा, शरद पवारांचं मुखमंत्र्यांना पत्र, भेटीची मागितली वेळ

आरएसएसच्या विजयादशमी कार्यक्रमाला इस्रो प्रमुख डॉ. राधाकृष्णन उपस्थित राहणार, रेशीमबागेत १२ ऑक्टोबरला कार्यक्रम, सरसंघचालक करणार संबोधित

कांदा निर्यातदारांच्या अडचणीत वाढ.सिस्टीम अपडेट नसल्यानं कागदपत्र तयार करण्यास अडचण. तर बांगलादेश बॉर्डरवर १०० ट्रक अडकले.

मुंबईतल्या अभिनेत्रीला छळणाऱ्या आंध्रातल्या तीन आयपीएस अधिकाऱ्याचं निलंबन, खोट्या प्रकरणात अटक करून छळ केल्याचा आरोप

अहमदाबाद आणि भरूचदरम्यान देशातील पहिल्या वंदे मेट्रोचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण, नमो भारत रॅपिड रेल असं रेल्वेकडून नामकरण

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram