Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 10 Jan 2025 : ABP Majha

Continues below advertisement

Top 100 Headlines :  टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 10 Jan 2025 : ABP Majha 
शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये बैठक, जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्ष पदावरून बदली करण्याचा बैठकीत सूर, वेळ देणारा आणि मराठा व्यतिरिक्त प्रदेशाध्यक्ष करा,पदाधिकाऱ्यांची शरद पवारांकडे मागणी.  
पुढील दोन दिवसात प्रत्येकाने केलेल्या कामांचा आढावा द्या, ८ दिवसांत प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो, जयंत पाटलांचं भर कार्यक्रमात सर्व कार्यकर्त्यांना आवाहन. 
जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला व्हावेत अशी मागणी कोणत्याही कार्यकर्त्याने केली नाही, ते बाजूला व्हावेत असं वाटत नाही, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया.  
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सर्वच प्रमुख पदांवर बदल करा, तसंच रोहित पवार आणि रोहित पाटलांना मोठी जबाबदारी देण्याची पदाधिकाऱ्यांनी मागणी केल्याची सूत्रांची माहिती.  
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के जागा महिलांना, तर उर्वरित जागा तरुणांना देण्यात येणार, प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शरद पवारांचं कार्यकर्त्यांना आश्वासन.
मराठवाड्यातील परिस्थितीबाबत शरद पवारांनी व्यक्त केली चिंता, जालना आणि बीड जिल्ह्यातील परिस्थिती बदलण्यासाठी पुढाकार घेणार, बैठकीत भाषणावेळी शरद पवारांची घोषणा.



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram