Top 100 Headlines :  टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 09 Sep 2024 : Maharashtra News : ABP Majha

Continues below advertisement

Top 100 Headlines :  टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 09 Sep 2024 : Maharashtra News : ABP Majha 
माजी खासदार राजू शेट्टी, छत्रपती संभाजी महाराज, आमदार बच्चू कडूंनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, परभणीच्या मानवत येथील वझुर येथे नेतेमंडळींकडून पाहणी. 
सरकारच्या कानफटात मारण्याची वेळ, परभणीमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर आमदार बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया.   
मुख्यमंत्र्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन थोडं बाजूला ठेवून शेतकऱ्यांचे दर्शन लवकर घ्यावं, उद्याच्या उद्या मदत दिली नाही तर आठ दिवसात कलेक्टरच्या घरात घुसू. बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना इशारा.
नांदेडमध्ये मंत्री अनिल पाटलांकडून अतिवृष्टीच्या नुकसानाची पाहणी, राज्यभरात  पंचनामे पूर्ण झाल्यावर मदत देण्याबाबत पुढील कारवाई होईल, मंत्री पाटील यांची माहिती. 
हिंगोलीमध्ये  मंत्री अनिल पाटलांकडून नुकसानाची पाहणी, सोयाबीन, कापूस आणि हळद  पिकाच्या नुकसानाचा घेतला आढावा, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, पाटलांची प्रतिक्रिया.
नांदेडच्या हदगाव, हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टी, ओला दुष्काळ जाहीर करून सरसरकट ५० हजार एकरी मदत करा, या मागणीसाठी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वात मोर्चा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram