TOP 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा: Maharashtra News : 03 June 2024
पोस्टल मतदानाचे निकाल हे पहिल्या फेरीच्या निकालाआधीच जाहीर झाले पाहिजेत, इंडिया आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी, मतमोजणी पद्धतीत बदल करण्यास सक्त विरोध
मुंबई पदवीधर मतदारसंघातून आज ठाकरे गटाचे अनिल परब आज फॉर्म भरणार, आदित्य ठाकरेही राहणार उपस्थित, दुपारी १२ वा. नवी मुंबईत कोकण भवन इथे फॉर्म भरणार
एनडीएमध्ये येण्यासाठी उद्धव ठाकरेंची मोदींना भेटण्याची इच्छा, भेटीसाठी अनेकांना मेसेज, दीपक केसरकर यांचा खळबळजनक दावा
अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेत अजित पवार गटानं तीन जागा जिंकल्या, अरुणाचलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत
अजित पवारांची राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी याचिका दाखल करण्य़ाची शक्यता, अरुणाचल प्रदेशमधील विजयानंतर पुन्हा राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी प्रयत्न
सलमान खानची हत्या करण्याचा आणखी एक कट उघड, लॉरेन्स बिष्णोई गँगच्या जॉनी वाल्मिकीला हरियाणातून अटक, नवी मुंबई पोलिसांची कामगिरी
अमूल दूधाच्या किंमतीत प्रति लीटर दोन रुपयांनी वाढ, नवे दर आजपासून लागू, दुधाच्या वाढलेल्या किंमतीमुळे नागरिकांना फटका.