टोमॅटो उत्पादकांना दिलासा मिळणार? तोट्याची 50% रक्कम केंद्र सरकार भरणार : ABP Majha
Continues below advertisement
टोमॅटोला भाव मिळत नसल्यानं एकीकडे बळीराजा लाल चिखल करतोय. तर तिकडे टोमॅटो खरेदीवरुन केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष रंगताना दिसतोय. कारण एमआयएस योजनेंतर्गत राज्य सरकारनं टोमॅटो खरेदी करावं आणि त्याची विक्री करावी, असा पर्याय केंद्रानं सुचवलाय... या खरेदी-विक्री व्यवहारात राज्याला जो तोटा येईल त्याचा ५० टक्के भार आता केंद्र सरकार उचलणार आहे. याबाबत राज्य सरकारनं केंद्राला प्रस्ताव पाठवण्याची सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केली. काल पवार यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी टोमॅटो निर्यात बंद केली नसल्याचंही स्पष्ट केलं.
Continues below advertisement