Toll Tax Hike : राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास महागला, पाहा किती भरावा लागणार कर ABP Majha

Continues below advertisement

आज 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास महाग होत आहे. महामार्गावर धावणाऱ्या वाहनांच्या टोलटॅक्स मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.अमरावती पासून 10 किलोमीटर असलेल्या नागपूर महामार्गावरील टोलवर आता कार आणि व्हॅन सारख्या वाहनांना 105 ऐवजी 115 रुपये तर हलके आणि वाणिज्य वाहन वाल्यांना आधी 160 रुपये द्यावे लागत होते आता मात्र 180 मोजावे लागेल.. जड वाहन आधी 330 होते आणि आता 365 झाले आहे तर अति जडवाहन आधी 510 रुपये होते आणि आता 560 झाले आहे. जड वाहनांसाठी 600 ऐवजी 710 रुपये मोजावे लागतील. त्यामुळे आधीच महागाई खूप वाढली आहे आणि टोल टॅक्स वाढल्याने सर्वसामान्य प्रवाश्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नांदगावपेठ या टोलनाक्या वरून आढावा घेतला आहे आमचे अमरावतीचे प्रतिनिधी यांनी पाहूया.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram