Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू

Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच,  पण टोलवसुलीही सुरू

गेली १७ वर्ष रखडलेला हा मुंबई गोवा महामार्ग....आज पूर्ण होईल, उद्या पूर्ण होईल असं म्हणता म्हणता १७ वर्ष उलटली, तरी ना महामार्गाचं काम अद्याप शंभर टक्के पूर्ण झालेलं नाही...अनेक पूल, सर्व्हिस रोड, बायपास यांची काम अजूनही सुरूच आहेत...पण असं असलं तरी प्रशासनानं मात्र प्रवाशांना आणि स्थानिकांना एक मोठा धक्का दिलाय...रायगडच्या खारपाडा इथे टोल उभारून प्रशासनानं टोल वसुली करण्याचा निर्णयही घेतलाय..सध्या या महामार्गावरून प्रवास करताना वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या अर्धवट कामांमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय...अशा परिस्थितीत टोलवसुली सुरू केल्यानं प्रवासी आणि स्थानिकांमध्ये प्रचंड संताप दिसून येतोय...मुंबई-गोवा महामार्ग... जवळपास १७ वर्ष उलटली तरी हा महामार्ग अजून अपूर्णच आहे. पण धक्कादायक बाब ही की महामार्ग अर्धवट असतानाही रायगडमध्ये टोल उभारून टोलवसुलीही सुरू करण्यात आलीये... त्यामुळे प्रवासी संतापलेयत... पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola