मदतीसाठी आलेले 1 कोटी 20 लाख दिले कुणाला?, नियामक मंडळ सदस्यांचा नाट्यपरिषदेला घरचा आहेर
Continues below advertisement
कोणत्याही विश्वस्त मंडळाच्या कामाची कार्यपद्धती ठरलेली असते. निवडून आलेल्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काम होणं अशी अपेक्षा असते. अखिल भारतीय नाट्यपरिषदही याला अपवाद नाही. पण अडीच वर्षात सत्ताधारी प्रसाद कांबळी यांनी नियामक मंडळाला विश्वासात न घेता चालवलेल्या मनमानी कारभाराबाबत मात्र निवडून आलेल्या सदस्यांनीच मौन सोडत घरचा आहेर दिला आहे.
Continues below advertisement