Thane:Abhijit Bangar यांची ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदावरून मुंबई पालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppThane:Abhijit Bangar यांची ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदावरून मुंबई पालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती
ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर अभिजीत बांगर यांची बदली करण्यात आली आहे. तीन वर्षांहून अधिक काळ एकाच पदावर किंवा आपल्याच जिल्ह्यात सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. त्यामुळं अभिजीत बांगर यांची ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदावरून मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच राजेश नार्वेकर यांची नवी मुंबई महापालिका आयुक्तपदावरून आयुक्त, सहकार आणि निबंधक सहकारी संस्था, पुणे या पदावर बदली करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर बदली करण्यात आली आहे.