हॉटेल, रेस्टॉरंटसाठी वेळेची मर्यादा हटवली, Swimming Pool Theme Park 50% क्षमतेने सुरू
कोरोनाचा प्रादुर्भाव घटत असल्यानं मुंबईत महापालिका क्षेत्रातील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईतील समुद्र किनारे, गार्डन, पार्क सुरु होणार आहेत. याशिवाय स्विमींग पूल, वॉटर पार्क, थिम पार्क ५० टक्के क्षमतेने सुरु होणार आहेत. हॉटेल, रेस्टॉरंटबाबत वेळेची मर्यादा हटवण्यात आलीय. हॉटेल्स, रेस्टॉरंटसाठी ५० टक्के क्षमतेची अट मात्र कायम ठेवण्यात आलीय.