पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून दूरदर्शनवर 'टिलीमिली' आनंददायी शिक्षण

Continues below advertisement
कोरोनाच्या संसर्गामुळे 14 मार्च पासून राज्यातील शाळा लॉकडाऊनमुळे बंद असताना त्या कधी उघडतील? याबाबत अजूनही अनिश्चिता असताना या कोरोना महामारीच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळावे यासाठी विविध पर्यायांचा अवलंब, विचार शिक्षण विभागाकडून केला जात आहे. त्यात पुण्याच्या स्वयंसेवी संस्था 'एमकेसीएल नॉलेज फाऊंडेशन'ने इयत्ता पहिली ते आठवी इयत्तेसाठी मराठी माध्यमातील पहिल्या सत्रातील शिक्षण दूरदर्शनवरील 'सह्याद्री' वाहिनीवर विद्यार्थ्यांना मोफत मिळावे यासाठी 'टिलीमिली' महामालिका सुरू करण्याचे ठरविले असून 20 जुलैपासून ही मालिका विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार असून जवळपास दीड कोटी विद्यार्थ्यांना यामुळे लाभ मिळणार असल्याची माहिती एमकेसीएलंकडून देण्यात आली आहे. मात्र, दूरदर्शनवर शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागाने सह्याद्री वहिनीला वेळ मागून सुद्धा मिळाली नसून आता याबाबत हा उपक्रम सुरू करण्याची एमकेसीएल स्वयंसेवी संस्थेला सह्याद्री वाहिनीकडून वेळ दिली गेली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram