Conversion via Online Gaming : मोबाईल गेमच्या आडून ब्रेन वॉश करत धर्मांतर केल्याचं प्रकरण उघडकीस
Continues below advertisement
उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये मोबाईलमधील ऑनलाईन गेमिंगद्वारे धर्मातर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. महत्त्वाचं म्हणजे, गाझियाबादमधल्या या धर्मांतराचं महाराष्ट्राशी कनेक्शन समोर आलंय, महाराष्ट्रातील मुंब्र्यातही ४०० जणांचं धर्मांतर करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. ऑनलाईन धर्मांतर करणाऱ्या मुख्य आरोपीनं हा गौप्यस्फोट केल्याचं डीसीपी निपुण अग्रवाल यांनी सांगितलंय. मोबाईल गेमच्या आडून ब्रेन वॉश करत धर्मांतर करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान, ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून अल्पवयीन मुलांचं ब्रेन वॉशिंग करत धर्मांतर करण्याच्या या रॅकेटचं जाळ महाराष्ट्रासह देशभरात पसरल्याचं बोललं जातंय. या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांची अनेक पथकं सध्या अॅक्शन मोडवर आलीयत.
Continues below advertisement