Ujjwal Nikam | हिवरे तिहेरी हत्याकांडप्रकरणी निकाल, दोन्ही दोषींना आजन्म कारावास | ABP Majha

 एकाच कुटुंबातील तीन महिलांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. सुधीर घोरपडे आणि रवींद्र कदम अशी आरोपींची नावं आहेत. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील हिवरे येथे 21 जून 2015 साली सुधीर घोरपडे यानं मित्राच्या साहाय्यानं शिंदे कुटुंबातील तीन महिलांची हत्या केली होती. सुधीरची बहीण विद्याराणीचं शिंदे कुटुंबात लग्न झालं होतं. सासरचे लोक त्रास देत असल्याच्या रागातून तिने आत्महत्या केल्याचा आरोप सुधीर आणि कुटुंबियांनी केला होता. तशी फिर्यादही विटा पोलिसात दिली. पण ते या खटल्यातून निर्दोष सुटले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola