Raghuvir Khedkar | तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्यावर दुःखाचा डोंगर, 12 दिवसात तिघांचा मृत्यू
Continues below advertisement
मुलीच्या मृत्यूची बातमी न समजताच आईने जगाचा निरोप घेतला तर आई व आजीच्या निधनाच वृत्त कानावर येण्याआधीच नातवाने सुद्धा जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक घटना घडलीय तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या कुटुंबात. कोरोनामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या तमाशा कलावंतांना कोरोनाने मोठा धक्का दिलाय. लोककला जीवापाड जपणाऱ्या रघुवीर खेडकर यांच्या कुटुंबातील तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून खेडकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आधी बहीण अनिता नंतर आई कांताबाई आणि आता भाचा अभिजित या तिघांचा गेल्या 12 दिवसात मृत्यू झाला असून अवघं खेडकर कुटुंब शोक सागरात बुडून गेलंय.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement