Priya Singh Case : प्रिया सिंह हल्ल्याप्रकरणी प्रियकर अश्वजीत गायकवाडसह तीन आरोपींना केली अटक
ठाण्यातील प्रिया सिंह हल्ल्याप्रकरणी प्रियकर अश्वजीत गायकवाडसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कासारवडवली पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या. पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्त्वातील एसआयटीने आरोपींना अटक केलीय. सोबतच घटनास्थळी असलेल्या लॅण्ड रोव्हर आणि स्कॉर्पिओ या दोन गाड्या देखील जप्त केल्या आहेत. अश्वजीत गायकवाड, रोमील पाटील आणि सागर शेळके अशी आरोपींची नावं आहेत. आज त्यांना ठाण्यातील दंडाधिकारी न्यायालयात सादर केलं जाणार आहे.