Maharashtra : यंदा राज्यातील देवस्थानांत मिळणाऱ्या देणग्यांमध्ये फेब्रुवारीच्या तुलनेत दुपटीने वाढ
Maharashtra : यंदा राज्यातील देवस्थानांत मिळणाऱ्या देणग्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्चमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. यामध्ये शिर्डीच्या साईचरणी सर्वाधिक दान अर्पण करण्यात आलं असून, अन्य प्रमुख देवस्थानांच्या एकत्रित देणग्यांपेक्षा ही रक्कम सहापटीने अधिक आहे. कोरोना निर्बंध शिथील झाल्यानंतर भाविकांची पावलं मंदिरांकडे वळली. भाविकांनी सढळ हाताने दान देण्यास सुरुवात केल्याने मंदिरांच्या दानपेट्या भरू लागल्या.