Eknath Shinde On Sanjay Raut: एकनाथ शिंदे गटातील लोक नरकासूर,संजय राऊतांची खोचक टीका

Continues below advertisement
अंबरनाथ येथील नाट्यगृहाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांच्यात पुन्हा एकदा राजकीय फटाके फुटले. कार्यक्रमात शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चेवरून 'भाऊबंदकी' नाटकाचा आधार घेत टीका केली, तर संजय राऊत यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. 'आज नरक चतुर्दशी आहे. नरकासुराचा जन्म कुठे झाला? गुवाहाटीला झाला. ते जे नरकासूर इकडे आहेत, त्यांची आज जयंती आहे', अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात, 'शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या सारखं पोटात दुखतंय', असा टोला लगावला आणि 'सतत रडणाऱ्या लोकांसाठी नाट्यगृहात क्राय रूम आहे', असे सांगत विरोधकांना डिवचले. यावर राऊत यांनी, 'भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत?', असा सवाल करत शिंदे यांच्या वाचनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola