Sharad pawar | खात्यांबाबत कुठलीही नाराजी नाही : शरद पवार | ABP Majha
मंत्रिपद मिळाले नाही म्हणून पक्षात कोणीही नाराज नसून गृहमंत्री आमच्याकडे नको असे म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे. खातेवाटपाबाबत 8 दिवसांपूर्वीच निर्णय झालेला असून तरुणांना जास्त संधी देण्यात आली आहे, असे शरद पवार यांनी सांगितले आहे. इतकेच नाही तर उद्या पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खातेवाटप जाहीर करतील असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.