MLC Elections : काँग्रेसच्या पराभवात कोणतही राजकारण नाही, मंत्री सुनिल केदार यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Nagpur MLC Election Result:  विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचा दणदणीत विजय झाला आहे.  भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपेक्षित विजय मिळवताना काँग्रेसच्या मतपेढीला सुरुंग लावला. बावनकुळे यांना भाजप आणि मित्रपक्षांची मते मिळालीच शिवाय त्यांनी काही महाविकास आघाडीची मते मिळाली असल्याचे समोर आले आहे. 

भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली. काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक छोटू भोयर यांना एक मत मिळाले.  महाविकास आघाडीची जवळपास 16 मते फुटली असल्याचे समोर आले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram