देशात Corona चा नवा Variant नाही, लसीकरणासाठी लोकांची मानसिकता बदलणं गरजेचं : HM Rajesh Tope

मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात काल 1632 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 744  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 32  हजार 138  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्के आहे. 
 
राज्यात काल 40 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 6955  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (15), नंदूरबार (0),  धुळे (4), जालना (50), लातूर(61),  परभणी (27), हिंगोली (24), नांदेड (16),  अकोला (22), अमरावती (12),  वाशिम (04), अकोला (23), बुलढाणा (14), नागपूर (72), यवतमाळ (06),  वर्धा (5), भंडारा (2), गोंदिया (3),  चंद्रपूर (57) गडचिरोली (7 ) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola