Prithviraj Chavan on BJP: काँग्रेस सोडून इतर कोणत्याही पक्षात अंतर्गत लोकशाही नाही- पृथ्वीराज चव्हाण
Continues below advertisement
कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक झाल्याने पक्षाच्या घटनेनुसार लोकशाही पद्धतीने निवडणुका होतायत हे दिसून आले.. मल्लिकार्जुन खर्गे अध्यक्ष झालेत. आम्ही सोनिया गांधींकडे ज्या मागण्या केल्या होत्या त्यातील ही प्रमुख मागणी होती. त्यानंतर पक्षांतर्गत निवडणूकीच्या इतर मागण्यांबाबत नवीन अध्यक्ष ठरवतील. जी 23 हे नाव मिडियाने दिले होते. आम्ही लिहलेले पत्र दुर्दैवाने लिक झाले. आमच्या मागण्या मान्य होण्यास दोन वर्षे लागली. कोवीडमुळे वेळ लागला. पण त्यानंतर सोनिया गांधींनी पाच तास बैठक घेऊन वेळ दिला. राहूल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे अशी दोन सत्ताकेंद्रे निर्माण होणार नाहीत. याआधीही अनेकदा कॉंग्रेसचा नेता वेगळा राहीलाय आणि अध्यक्ष वेगळा.
Continues below advertisement
Tags :
Democracy Covid Election Sonia Gandhi Congress President Mallikarjun Kharge Rahul Gandhi Power Centers