Weather News : राज्यात काही दिवसांसाठी दडी मारलेली थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता

राज्यात काही दिवसांसाठी दडी मारलेली थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. मागच्या दोन दिवसांपासून पुण्यात गारठा चांगलाच वाढलाय. तसंच पुढील काही दिवस तापमान अजून घटण्याची शक्यता शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.  विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यातील काही भागांमध्ये  १०.०अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. तर नाशिकमध्ये ११.६ अंश तापमानाची नोंद झालीय. राज्यातील तापमानात पुन्हा चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola