Coal Shortage : संपूर्ण देश वीजटंचाईच्या उंबरठ्यावर, 3 दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक
Continues below advertisement
Coal Shortage: देशावर वीज संकटाचा धोका निर्माण झाला आहे. खरं तर, देशातील 72 पॉवर प्लांटमध्ये फक्त तीन दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. ऊर्जा मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. वीज मंत्रालयाने म्हटले आहे की, जर कोळसा वेळेवर पुरवला गेला नाही तर देशातील अनेक वीज प्रकल्प बंद पडू शकतात.
उर्जा मंत्रालयाच्या मते, जर कोळसा वेळेवर उपलब्ध झाला नाही, तर देशात मोठे वीज संकट येऊ शकते.
सप्टेंबरमध्ये उत्पादन वाढले
सरकारी मालकीच्या कोल इंडियाचे कोळसा उत्पादन सप्टेंबरमध्ये किरकोळ वाढून 47 दशलक्ष टन झाले आहे. कोल इंडियाचे उत्पादन अशा वेळी वाढले आहे जेव्हा देशातील औष्णिक वीज केंद्रांना कोळशाच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे.
Continues below advertisement