Guru Purnima | शिर्डीत तीन दिवसीय गुरूपौर्णिमा उत्सव सुरू
Continues below advertisement
कोरोनाच्या सावटामुळे शिर्डी साई मंदिरातील गुरुपौर्णिमा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. साई संस्थानच्या इतिहासात प्रथमच भक्तांविना हा उत्सव साजरा होणार आहे. आज 4 जुलै ते 6 जुलै असा तीन दिवस हा उत्सव साजरा होणार आहे. मात्र तो अगदी साध्या पद्धतीने केवळ धार्मिक विधी या दरम्यान पार पडणार आहेत. रथ यात्रा तसेच पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. पायी पालख्या घेऊन येणाऱ्या भाविकांना देखील पालख्या न आणण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Continues below advertisement