Corona Third Wave : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोक्याची? लहानग्यांसाठी लस कधी येणार?
मुंबई: देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट तीव्र झालेले असतानाच 10 वर्षांखालील लहान मुलांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय, या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष देऊन तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी विनंती शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना याविषयी लिहिलेल्या पत्रात खासदार शेवाळे यांनी विविध राज्यांतील लहान मुलांच्या कोरोना संसर्गाची आकडेवारी देऊन या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे.