Thackeray To Election Commission : ठाकरे गटाचं निवडणूक आयोगाला पत्रातून खरमरीत उत्तर
शिवसेनेतल्या ठाकरे आणि शिंदे गटांमधली धनुष्यबाण चिन्हासाठीची लढाई निवडणूक आयोगात पोहोचली आहे. शिंदे गटानं ठाकरे गटाकडून धनुष्यबाण चिन्हाचा गैरवापर होत असल्याचा आरोप करून, त्या चिन्हावर दावा केला आहे. शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे आज कागदपत्रं आणि कार्यकर्त्यांची प्रतिज्ञापत्रं सादर करण्यात आली. या दाव्याची तातडीनं दखल घेऊन निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत कागदपत्रं सादर करण्याची मुदत दिली आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या दाव्याला कडाडून विरोध करण्यात आला आहे.
Tags :
Election Commission Fight Thackeray Shiv Sena Shinde Group Misuse Of Symbol Bow And Arrow Symbol Documents Affidavits Of Workers To Election Commission Violent Opposition